Tourist Place In Maharashtra : महाराष्ट्र राज्याला देखील एक सुंदर असा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील निसर्गाने नटलेली अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमी आकर्षित करत असतात. तसेच पावसाळ्यात तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊन तुमच्या सहलीचा आनंद वाढवू शकता.
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांना समुद्र किनारे आणि मोठमोठे डोंगर लाभलेले आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जाणे तुमचा आनंद नक्कीच वाढवू शकते. पावसाळ्यात महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना देशातूनच नाही तर जगभरातून पर्यटक भेट देत असतात.
महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी डोंगर दऱ्या आहेत अशा ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात फिरू शकता. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील पावसाळ्यात फिरण्यायोग्य ठिकाणे…
आर्थर लेक
महाराष्ट्रातील सुंदर पर्यटन ठिकाणांपैकी प्रवरा नदीवर असलेला आर्थर लेक. तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी जाऊन तुमच्या सहलीचा आनंद वाढवू शकता. हा तलाव डोंगर आणि जंगलांनी वेढलेला आहे. तुम्हाला जर कॅम्पिंग करायचे असेल तर हे ठिकाण सर्वोत्तम आहे. या ठिकाणी तुम्ही बोटींगचा देखील आनंद घेऊ शकता.
विल्सन धरण
विल्सन धरण देखील पर्यटकांसाठी चांगले पर्यटन स्थळ तयार झाले आहे. हे धारण सर्वात जुन्या धरणांपैकी एक आहे. प्रवरा नदीवर समुद्रसपाटीपासून 150 मीटर उंचीवर बांधण्यात आलेले हे धरण आहे. या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता.
कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची उंची १६४६ मीटर आहे. या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात लाखो पर्यटक भेट देत असतात. तसेच हे शिखर तुम्हाला ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे.
माळशेज घाट
जर तुम्ही पावसाळ्यात माळशेज घाटामध्ये फिरायला गेला तर तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे धबधबे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. हा घाट समुद्रसपाटीपासून 7000 फूट पेक्षा जास्त उंचीवर आहे. या ठिकाणी तुम्ही सुंदर धबधबे आणि थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता.
माथेरान
महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन पैकी माथेरान हे एक आहे. मात्र या ठिकाणी पावसाळ्यातच पर्यटक गर्दी करत असतात. या ठिकाणी पावसाळ्यात तुम्हाला सुंदर धबधबे पहायला मिळतील. माथेरान हे सह्याद्री पर्वत रंगामध्ये वसलेले पर्यटन स्थळ आहे. तुम्ही माथेरानमधील शार्लोट लेक, मंकी पॉइंट, शिवाजीचा जिना, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट यांसारखी उत्तम ठिकाणांना भेट देऊ शकता.