लाईफस्टाईल

केमिकलयुक्त आंबे खाल तर आरोग्याची लावाल वाट! आंबे खरेदी करताना ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि नैसर्गिक पिकलेले आंबे खा

खाद्यपदार्थांमधील भेसळ ही एक ज्वलंत समस्या असून दुधापासून तर थेट मसाल्यांपर्यंत आता भेसळ करण्यात येते व यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. जिऱ्यामध्ये देखील भेसळीची घटना आपण मागे काही दिवसांपूर्वी वाचल्या किंवा ऐकले असतील. अशा पद्धतीने भेसळीचे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

याच पद्धतीने फळांच्या बाबतीत देखील आपल्याला दिसून येते. बहुसंख्य फळ आता नैसर्गिक पद्धतीने न पिकवता काही केमिकलचा वापर करून ती पिकवली जातात. त्यामुळे आरोग्याला धोका संभवतो. सध्याचा कालावधी उन्हाळ्याचा असून या कालावधीमध्ये आंबे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात.

परंतु बऱ्याचदा आंबे देखील रसायनांचा वापर करून पिकवले जातात व यामुळे  आरोग्याला काही नुकसान होण्याची शक्यता असते. आंब्यासारख्या फळांमध्ये कॅल्शियम कार्बाईड नावाचे रसायन वापरले जाते व अशा रसायन आणि पिकवलेला आंबा जर खाल्ला तर पोट फुगणे तसेच जुलाब व पोटात गॅस होण्याच्या समस्या उद्भवतात.

आंब्या बाबतच्या केले गेलेले अनेक संशोधनानुसार दिसून आले आहे की जर केमिकल पद्धत वापरून जर आंबा पिकवला व त्याचे सेवन जास्त प्रमाणात केले तर त्यांचा धोका देखील वाढतो. अशा पद्धतीने पिकवलेल्या आंबांमध्ये जीवनसत्व आणि खनिजांचे प्रमाण देखील कमी होते व त्या तुलनेत मात्र हानिकारक विषारी पदार्थांचे प्रमाण जास्त असते

व त्यामुळे हृदय विकार, किडनी संबंधीचे आजार तसेच डायबिटीस देखील होऊ शकतो. त्यामुळे आंबे खरेदी करताना ते नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत की केमिकलने हे पाहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे खरेदी करताना कसे ओळखावे याच्या काही टिप्स पाहणार आहोत.

 या टिप्स वापरा आणि आंबा नैसर्गिक रीतीने पिकवला आहे की केमिकलने हे ओळखा

1- रंगावरून ओळख जेव्हा आपण बाजारामध्ये आंबा खरेदी करायला जातो तेव्हा त्याचा रंग अगोदर पाहतो. परंतु या रंगावरूनच तुम्हाला आंबा केमिकल वापरून पिकवला आहे की नाही हे ओळखता येते. आंबा जर नैसर्गिक पद्धतीने पिकलेला असेल तर तो हलक्या पिवळ्या रंगाचा किंवा हिरवा असतो. परंतु आंबे पिकवण्यासाठी जर केमिकल वापरले असेल तर ते एक पिवळे असतात व त्यावर हिरवे चट्टे दिसून येतात.

2- आंब्यांवरील मार्किंग म्हणजेच निशाणी पाहणे पिकलेल्या आंब्यावरच्या ज्या काही खुणा असतात त्यावरून देखील आंबा आपल्याला केमिकलचा वापर करून पिकवला आहे की नाही हे ओळखता येते. बऱ्याचदा आपल्याला आंब्यांवर त्वचेच्या छिद्रासारख्या अनेक निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या मार्किंग दिसून येतात. त्यामुळे असे आंबे विकत घ्यायचे टाळावे. कारण जास्त प्रमाणात केमिकलचा वापर केल्या गेल्यामुळे आंब्यांवर अशा प्रकारच्या मार्किंग येतात.

3- बकेट टेस्ट करणे आंबा खरेदी करून घरी आणल्यानंतर सर्व आंबे पाण्याने भरलेल्या बादलीमध्ये टाकावेत. त्यानंतर जे आंबे पाण्यामध्ये स्थिर होतील ते नैसर्गिकरित्या पिकलेले असतात. याशिवाजी जे आंबे वर तरंगणारे आहेत ते रसायनांचा वापर करून पिकवलेले असतात.

4- आंबा कापून तपासणी करणे आंबा कापल्यानंतर जर त्याचा रंग गडद पिवळा असेल तर तो नैसर्गिकरित्या पिकवलेला असतो. परंतु त्या उलट आंब्याच्या कडा जर गडद आणि त्याचा गर जर हलका पिवळा असेल तर तो रसायनांचा वापर करून पिकवलेला आहे हे समजून घ्या.

5- वास महत्त्वाचा त्यामध्ये आंब्यांचा येणारा गंध खूप महत्त्वाचा असतो. कारण जे आंबे केमिकलचा वापर करून पिकवलेले असतात त्यांना खूप कमी सुगंध असतो वा कधी कधी सुगंध येतच नाही. पण नैसर्गि रित्या पिकवलेले आंब्यांचा वास हा गोड व सुगंधीत येतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts