Vastu Tips : घरातील सदस्य अनेकदा घरामध्ये चुकीची कामे करत असतात. त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये नेहमी काही कामे करणे टाळले पाहिजे. कारण अशी काही चुकीची कामे तुम्हाला देखील कंगाल बनवू शकतात.
दैनंदिन जीवनात अनेकांकडून वास्तू चुका होत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे सतत पैशांची कमतरता भासत असते. त्यामुळे तुम्ही खालील चुका करणे नेहमी टाळा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये देखील पैशांची कमतरता भासणार नाही.
घरामध्ये पैसे टिकवण्यासाठी सोप्या वास्तु टिप्स जाणून घ्या –
कचरा कुंडी
तुम्हाला तर माहिती असेल की माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते. त्यामुळे घामध्ये कधीही कचरा होऊ देऊ नका. जर असे झाल्यास तुमच्या घरामध्ये देखील पैशांची कमतरता भासू शकते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात डस्टबिन किंवा कचरा ठेवू नये.
पाणी
घरामधील पाण्याबद्दल देखील वास्तु शास्त्रामध्ये विशेष गोअष्ट सांगण्यात आली आहे. जर तुमच्या घरातील नळामधून सतत पाणी टिपकत असेल तर हे देखील तुमच्यासाठ अशुभ लक्षण असू शकते. जर असे होत राहिल्यास तुमचा जास्तीचा पैसा खर्च होतो. यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही.
स्वयंपाकघर
तज्ज्ञांच्या मते, वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच आग्नेय दिशेला असावे. पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असेल तर घरात धनाचे आगमन चांगले होते पण आशीर्वाद मिळत नाही. म्हणजेच पैसा येताच खर्च होत राहतो.
तिजोरी
घरामध्ये तुमची तिजोरी कुठे आहे यावर देखील माता लक्ष्मीचा प्रभाव वेगवेगळा असू शकतो. वास्तु टिप्समध्ये तिजोरी दक्षिण भिंतीला लागून ठेवणे योग्य आहे. म्हणजे तिजोरीची दिशा अशी असावी की तिजोरीचे तोंड उत्तरेकडे उघडावे. तिजोरीचे तोंड उत्तरेकडे असेल तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते असे मानले जाते.
तुटलेला पलंग
घरामध्ये कधीही कोणतीही तुटलेली वस्तू ठेऊ नये. तसेच घरामध्ये तुटलेला पलंग देखील ठेऊ नये. जर तुम्ही असे केल्यास तुमच्यावर आर्थिक संकट वाढू शकते. घरातील तुटलेला पलंग काढून टाकल्यास तुमच्याकडे पैशाची आवक वाढू शकते.