Vastu Tips : खरंतर ऑफिस, घर किंवा दुकानात साफसफाईसाठी झाडूचा वापर करण्यात येतो. हिंदू धर्मामध्ये या झाडूला माता लक्ष्मीचे रूप मानले आहे. त्यामुळे तुम्ही झाडू वापरल्यानंतर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. समजा तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते.
अशातच जर तुम्ही आर्थिक संकटात असाल तर हाच झाडू तुमच्या कामी येईल. तुम्ही झाडूचे काही उपाय केले तर तुम्ही या संकटातून मुक्त होऊ शकता. शिवाय तुमच्या घरात समृद्धी येऊ लागते. कसे ते जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
खरंतर झाडू हे घर स्वच्छ करण्यासाठी एक माध्यम मानले आहे. वास्तुशास्त्रानुसार झाडूच्या मदतीने घरातील सर्व नकारात्मकता आणि दुर्भाग्य दूर करता येते. आता झाडूमधील उर्जा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी शुभेच्छा आणण्यासाठी वापरता येईल. कसे ते जाणून घ्या.
नशीब बदलण्यासाठी करा हे उपाय
जर तुम्हाला तुमचे नशीब बदलायचे असेल तर गुरुवारी घरात नवीन झाडू आणा. त्यासोबत कचरा बाहेर काढावा. आता कचरा बाहेर काढल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवा तो कोणाला दिसणार नाही. असे केल्याने तुमच्या घरात समृद्धी येईल आणि तुमच्यावरचे आर्थिक संकटही दूर होईल.
समजा तुम्हाला देवी लक्ष्मीला तुमच्या घरी बोलावायचे असल्यास तर ज्योतिष शास्त्राने त्यावरही उपाय सुचवला आहे. गुरुवारी तुम्हाला सोन्याचा छोटासा झाडू बनवावा लागणार आहे. हे सोन्याचे झाडू काही दिवस पूजेच्या ठिकाणी ठेवले की ते त्यानंतर घरातील तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील.
अनेक वेळा एखादी व्यक्ती इतकी आजारी पडते की ती लवकर बरी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही झाडूची युक्ती करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त गुरुवारी सकाळी उठून संपूर्ण घर झाडून काढायचे आहे. त्यानंतर आता सर्व खोल्यांमध्ये गंगाजल शिंपडा. असे केल्याने तुमच्या घरातील रुग्ण लवकर बरा होईल.