Vastu Tips : हे लक्षात घ्या की वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या वास्तूचे चांगल्या तसेच सुरक्षीततेसाठी संतुलन ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच घर बांधत असताना असो किंवा घर सजवताना असताना वास्तू नियमांची काळजी तुम्हाला घ्यायला हवी.
नाही तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष केले तर कुटुंबातील सदस्यांची प्रगती रोखली जाते. इतकेच नाही तर कुटुंबातील सदस्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
अनेकदा असे होते की आपण घरात ठेवलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींनाही वास्तूनुसार एक वेगळे महत्त्व असते. अनेकदा लोक या गोष्टी घरात चुकीच्या ठिकाणी ठेवून किंवा त्याच्या चुकीच्या वापरामुळे त्यांना धोकादायक वास्तू दोषांना सामोरे जावे लागते. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घ्या.
लक्षात ठेवा या गोष्टी
वास्तुशास्त्रानुसार एखाद्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी अंधारात ठेवणे अतिशय अशुभ आहे. खरतर वास्तुनुसार मुख्य दरवाजा योग्य प्रकारे न रंगवणे किंवा आकर्षक नसणे हे अशुभ असते. त्यामुळे तुम्हाला अपयश येऊ शकते.
वास्तू तज्ज्ञांच्या मतानुसार, घरात कोणत्याही चुकीच्या चित्राचा वापर केला तर त्याचे गंभीर परिणाम होत असतात. अशा परिस्थितीत तुमच्या घरातील कोणत्याही चित्रावर धूळ साचू देऊ नका. तसेच खूप चित्रे एकत्र असणे हे देखील चांगले नाही. कारण असे केल्याने तुमच्या घरात विनाकारण वाद होत राहतील.
हे लक्षात घ्या की तुम्ही घरातील कपडे आणि जोडे वापरल्यानंतर ते इकडे-तिकडे फेकून दिले तर वास्तुदोष निर्माण होतात. वास्तू नियमांनुसार शूज आणि कपड्यांचे वॉर्डरोब नेहमी इकडे-तिकडे ठेवले तर पैशाचा अपव्यय होतो. इतकेच नाही तर करिअरमध्ये देखील चढ-उतार होत राहतात. अशा परिस्थितीत या महत्त्वाच्या गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
समजा वास्तू नियमानुसार तुम्ही जुने कपडे-शूट घरात ठेवले किंवा जुन्या निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्या तर खूप मोठे नुकसान होते. यामुळे घरामध्ये आजार आणि चिंता वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पादत्राणांशी निगडित वास्तु टिप्सची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
त्याशिवाय वास्तुशास्त्रानुसार घरातील पाण्याचा अपव्यय झाला तरीही वास्तुदोष निर्माण होत असतात. त्यामुळे घरातील पाणी कधीही वाया जाऊ देऊ नये. वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ असे सांगतात की वास्तूच्या या दोषामुळे मानसिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे.