Ajab Gajab News : शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकच्या बर्फाखालील एक विस्तीर्ण क्षेत्र शोधून काढले असून त्यात लाखो वर्षांपासून पर्वत, दऱ्या अन् नद्या असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. अंटार्क्टिकवरील हे क्षेत्र आकाराने बेल्जियमपेक्षा मोठे असून
सुमारे ३४ दशलक्ष वर्षांपासून ते बर्फाखालीच असल्याने तिथे कोणीही पोहोचू शकलेले नाही. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्क्टिकवरील बर्फ वितळत असल्याने युनायटेड आणि अमेरिकन संशोधन चिंतेत आहेत.
बर्फाच्छादित अंटार्क्टिकमधील ही एक आतापर्यंत कोणालाही न सापडलेली जमीन आहे, ती आतापर्यंत कोणाच्याही लक्षात आलेली नाही. विशेष म्हणजे संशोधकानी ही जमीन शोधण्यासाठी कोणताही नवीन डेटा वापरला नसून
केवळ नवीन पद्धती वापल्याचे डरहम युनिव्हर्सिटीचे ग्लेशियोलॉजिस्ट स्टीवर्ड जेमिसन यांनी स्पष्ट केले आहे. ही जमीन बर्फाच्या काठापासून काही किलोमीटर अंतरावर असून अंटार्क्टिकच्या मोठ्या भागावर दूरवर केवळ बर्फच दिसतो.
परंतु शास्त्रज्ञांनी या बर्फाखाली लपलेला एक विशाल भूभाग शोधला असून त्यात पर्वत, दऱ्या आणि प्राचीन नद्या असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.