महाराष्ट्र

फडणवीसांचे ‘इतके’आमदार पाडणार, ‘या’ तारखेपासून पुन्हा उपोषण ! मनोज जरांगेंचा निर्धार

मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या तयारीत आहेत. आज त्यांनी झालेल्या बैठकीत मोठा निर्धार बोलून दाखवला.

त्यांनी पुन्हा एकदा 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

मराठा समाजाला आरक्षण तर मिळून देणारच असा निर्धार व्यक्त करत देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी असल्याची टीका त्यांनी केली. तसेच आरक्षण दिले नाही तर येत्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचे 113 आमदार पाडणार असा निर्धारच त्यांनी व्यक्त केलाय.

दरम्यान अंतरवाली सराटी येथे आयोजित बैठकीदरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या निर्णयाला उपस्थित आंदोलकांनी विरोध करत उपोषण करू नये अशी विनंती केली.

आज 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी मधील झालेल्या आंदोलनाला आज वर्ष पूर्ण झाल्याने गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक जरांगे पाटील यांनी बोलावली होती. या बैठकीत त्यांनी वरील निर्धार केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र
मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. फडणवीस हे जातीयवादी आहेत. त्यांचे 113 आमदार पाडणार आहोतच पण भाजपमधीलच काही लोक एकत्र येत फडणवीसांचा

काटा काढणार असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. यासोबतच त्यांनी फडणवीसांचे लोक आपल्याला रात्री येऊन भेटत असल्याचा दावा देखील यावेळी केला. यावेळी पाटलांनी माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यावरही तोफ डागत मी बिघडलो तर सगळं साफ होईल आणि तुम्हाला ग्रामपंचायत देखील विजयी होता येणार नाही असा हल्लाबोल केला. 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts