महाराष्ट्र

MSRTC News : यंदा गणेशोत्सवासाठी १५०० गाड्या ! महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार का नाही ? वाचा सविस्तर

MSRTC News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यंदाही गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. यावर्षीही या महामंडळाच्या ठाणे विभागाने कोकणात गतवर्षापेक्षा ५०० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये ग्रुप आरक्षणावर विशेष भर दिला आहे.

सलग तिसऱ्या वर्षी ठाणे विभागातून गणेशोत्सवात कोकणवासीयांसाठी बसगाड्यांची संख्या वाढल्याची दिसत आहे. २०२२ साली एक हजार ८ गाड्यांचे नियोजन केले होते. मात्र ऐनवेळी बस गाड्यांची संख्या एक हजार ३७२ वर पोहोचली होती.

त्यामुळे यंदा एक हजार ५०० गाड्यांचे नियोजन ठाणे (एसटी) विभागाने केले आहे. यामध्ये ग्रुप बुकिंगसाठी १ हजार १००, तर ४०० गाड्या तिकीट आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. शेवटच्या क्षणी गणेशभक्तांकडून बसेसची मागणी झाल्यास जादा बसेस सोडण्यात येतील, असेही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागामार्फत सांगण्यात आले.

१९ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी- गणपती या सणाला येत्या १४ ते १८ सप्टेंबरदरम्यान मुख्य वाहतूक केली जाणार आहे. तर संगणकीय आरक्षण प्रणालीमध्ये ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सोय उपलब्ध असल्याने यावर्षी गौरी- गणपती जादा वाहतुकीसाठी शुक्रवारपासून म्हणजे १४ जुलैपासून आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ठाणे विभागाच्या सात आगारांतून गणेशोत्सवासाठी चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, साखरपा, राजापूर, रत्नागिरी, लांजा, देवगड, कणकवली, विजयदुर्ग, महाड, माणगाव, श्रीवर्धन या मार्गांवर जादा बसगाड्या नियोजनानुसार आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.

शासनाने एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना जाहीर केलेल्या सवलतीचे हे पहिले वर्ष असणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता अधिक आहे. शासनाने जाहीर केलेली सवलत या कालावधीत सुरू राहणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: MSRTC News

Recent Posts