जिल्हा रूग्णालयासमोरच आढळले १६ कोरोनाबाधित रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  अहमदनगर शहरासह जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनमुक्त असणारे नगर शहर झपाट्याने कोरोनाबाधित होऊ लागले आहे.

शहरातील संख्या आता जास्त होऊ लागली आहे. मंगळवारी रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१ रुग्ण सापडले आहेत.

धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी कोरोना तपासणी व बाधितांवर उपचार होतात आणि जेथून आरोग्याची सूत्रे हलवली जातात अशा जिल्हा रुग्णालय समोरील गवळीवाडा, कवडेनगर या ठिकाणी एकूण 16 रुग्ण सापडले आहेत. काल दिवसभरात 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मंगळवारी रात्री उशिरा बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २१, जामखेड येथील ०२ (पुण्याहून प्रवास करून आलेले) आणि पारनेर तालुक्यातील लोणी मावळा (मुंबईहून प्रवास करून आलेला) एका रुग्णाचा समावेश आहे.

मनपा क्षेत्रात गवळी वाडा, कवडे नगर, ढवण वस्ती, नित्यसेवा (सावेडी), सिद्धार्थनगर आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान,अहमदनगर जिल्ह्यातील २६ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे.आज 26 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात, नगर मनपा १४, कोपरगाव ०३, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०४, श्रीरामपूर ०१. येथील रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts