7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता मोदी सरकार कर्मचाऱ्यांना गुड न्युज देणार आहे. याचा फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो, तो लवकरच 42 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा 65 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 48 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. यानंतर 1 जुलै 2023 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये पुन्हा वाढ होणार आहे.
AICPI निर्देशांकाच्या आधारावर वाढ होईल
ही वाढ कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आली आहे. डिसेंबरमधील घसरणीनंतर जानेवारीचा आकडा पुन्हा वाढला आहे. हा आकडा पाहिल्यानंतर येत्या जुलैमध्ये डीएमध्ये 4 टक्के वाढ होणार असल्याचे दिसते.
वास्तविक, जानेवारी ते जून या कालावधीतील AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे, जुलैमध्ये डीएमध्ये वाढ होईल. जुलै महिन्याची महागाई भत्ता वाढ अनेकदा सप्टेंबरमध्ये सरकारकडून जाहीर केली जाते.
AICPI 132.8 अंकांवर पोहोचला
डिसेंबर 2022 चा आकडा 132.3 अंकांवर होता. शेवटच्या दिवशी जाहीर झालेला जानेवारी 2023 चा आकडा 132.8 अंकांवर पोहोचला आहे. आगामी काळात AICPI याच्या वर जाऊ शकते. अशा परिस्थितीत 1 जुलैपासून लागू होणार्या डीएमध्ये 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. जानेवारीनंतर येणार्या AICPI इंडेक्स डेटाच्या आधारे जुलैचा DA जाहीर केला जाईल.
डीए वर्षातून दोनदा वाढतो
सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वर्षातून दोनदा वाढवला जातो. आता जानेवारी 2023 चा DA लवकरच जाहीर केला जाईल. यानंतर जुलै 2023 चा DA जाहीर केला जाईल.
डेटा कोण जारी करतो?
AICPI निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे ठरविले जाते? दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाद्वारे जारी केली जाते.