बलात्कार करुन हत्या करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-नांदेड जिल्ह्यातील बिलोली गावात मुकबधीर मुलींवर बलात्कार करुन निघृण हत्या करणार्‍या आरोपींना नवीन कायद्यातंर्गत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन मानवहित लोकशाही पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा आशाताई गाडे, सरचिटणीस आधाताई ससाणे, शहराध्यक्ष महादेव नेटके, अनिल ससाणे, युवा तालुकाध्यक्ष पांडूरंग शेंडगे, खंडू शेंडगे, भिमराज वाघचौरे, दिनेश वैरागर, विजय डाडर आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिलोली शहरात दि. 9 डिसेंबर 2020 रोजी गरीब मुकबधीर मुलीवर दोन-तीन नराधमांनी बलात्कार करुन दगडाने ठेचून अमानुष खून केला.

या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून नवीन कायद्यांतर्गत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदरच्या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला आहे.

तरी सदरील घटना अत्यंत निंदनीय आणि धृणास्पद असून, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.

समाजात अशी घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. सदर प्रकार गंभीर असून, तातडीने कार्यवाही व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts