अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : महायानक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहेत्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे -त्यांनी ट्विट करून सांगितले की, मला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हॉस्पिटल संबंधितांना माहिती देत आहे. कुटुंबातील इतराची सुद्धा चाचणी करण्यात येत आहे. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांना किडनीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अमिताभ बच्चन लवकरचं रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे. याअगोदर बिग बी अखेरीस गुलाबो-सिताबो या चित्रपटात पाहायला मिळाले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews