Mhada News : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांच्या सोडतीसाठी बिग बॉस फेम अक्षय केळकर तर हास्य जत्रेतील पृथ्वीक प्रताप,
अश्विनी कासार यासारख्या अनेक कलाकारांनी अर्ज दाखल केले आहेत. काही कलाकारांनी मे महिन्यात पार पडलेल्या कोकण मंडळाच्या सोडतीतही घरांसाठी अर्ज दाखल केले होते. म्हाडा मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी २२ मेपासून सोडत अर्ज विक्री व स्वीकृतीला सुरुवात झाली होती.
मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथील घरे सोडतीसाठी उपलब्ध होती. म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा सर्वसामान्यांसह कलाकारांनाही असल्यामुळे अनेक कलाकार घरांबाबत आपले नशीब आजमावत असल्याचे दिसून येते.
मे महिन्यात पार पडलेल्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठीही पृथ्वीक प्रतापसह अन्य कलाकारांनी घरासाठी अर्ज केले होते. यंदा मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी अक्षय केळकर, पृथ्वीक प्रताप, अश्विनी कासार, योगिता चव्हाण यासारख्या अनेक कलाकारांनी अर्ज केले आहेत.
१७ जुलै रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये ५२७ अर्ज अपात्र ठरल्याचे दिसून आले होते. या अर्जदारांन १९ जुलैपर्यंत पात्रता निश्चित करण्याची संधी मिळणार आहे त्यानंतर आत्तापर्यंत १ लाख ६ हजा ७९९ अर्ज ऑनलाइन संगणकीय सोडतीत सहभागी असल्याचे म्हाडाने अधिकृतरीत्या जाहीचे केले आहे. बुधवारपर्यंत काही अर्ज पात्र झाल्यानंतर संगणकी सोडतीतील अर्जदारांचा सहभाग वाढणार आहे.