अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- कोविड प्रतिबंधक नियमावली आणि ओमायक्रॉन विषाणू संसर्गासंदर्भात घ्यावयाची काळजी या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. नूतन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.(corona news)
या पार्ट्यांच्या निमित्ताने गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जेणेकरुन विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर देखील वाहतूक शाखेची करडी नजर राहणार आहे.
अशा वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. वेळ पडल्यास अशा वाहनचालकांवर न्यायालयीन कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे यंदा देखील नूतन वर्षाचे स्वागत नागरिकांना मर्यादेत राहूनच करावे लागणार आहे.