महाराष्ट्र

Agri Machinery Subsidy: ट्रॅक्टरवर मिळेल तब्बल आता 5 लाखांचे अनुदान! इतर काही यंत्रांच्या अनुदानात देखील केली मोठी वाढ, वाचा माहिती

Agri Machinery Subsidy:- शेतीमध्ये आता दिवसेंदिवस विविध कामांसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून शेताच्या पूर्व मशागतीपासून तर कापणीपर्यंत विविध यंत्रे शेतामध्ये वापरले जातात. यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील विविध योजना राबवल्या जात आहेत.

या योजनांच्या अंतर्गत अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते व कृषी यांत्रिकीकरणाला बळ मिळून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या दृष्टिकोनातून सरकारचा हा प्रयत्न आहे. जर आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा विचार केला तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या उप अभियान हे देखील एक महत्त्वाची योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रे व उपकरणाच्या खरेदीवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात होते. परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला असून अनुदानात वाढ करण्यात आली आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या लेखात महत्त्वाची माहिती घेऊ.

 ट्रॅक्टर इतर यंत्रांच्या अनुदानात मोठी वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असून या योजनेच्या माध्यमातून शेतीमध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवा याकरिता अनुदान स्वरूपात मदत केली जाते. अगोदर कृषी यंत्र व उपकरणांवर या योजनेच्या अंतर्गत 50 ते 80% पर्यंत अनुदान मिळत होते.

परंतु आता या योजनेमध्ये शासनाने मोठा बदल केला असून मिळणाऱ्या अनुदानामध्ये भरघोस अशी वाढ करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने ट्रॅक्टर, पावर टिलर तसेच कम्बाईन हार्वेस्टर या यंत्रांच्या अनुदानामध्ये जवळजवळ तिप्पट वाढ झालेली आहे.

यानुसार आता ट्रॅक्टर खरेदी करताना ट्रॅक्टरकरिता तब्बल पाच लाखांचे अनुदान मिळणार असून पावर टिलर करिता एक लाख वीस हजार तर कम्बाईन हार्वेस्टर करिता आठ लाखांचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे.

 कसे असणार आता मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप?

या अंतर्गत आता ट्रॅक्टर, पावर टिलर, हार्वेस्टर, नांगर तसेच पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर आणि चॉपकटर यासारख्या कृषी यंत्रांवर सामान्य श्रेणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत जास्तीत जास्त अनुदान मिळणार असून एससी/ एसटी /

अत्यंत मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा विचार केला तर ट्रॅक्टरकरिता 4WD( 40 पीटीओ एचपी किंवा अधिक) करिता जनरल प्रवर्गासाठी चार लाख रुपये अनुदान मिळणार असून एससी/ एसटी प्रवर्गाकरिता पाच लाखांचे अनुदान मिळणार आहे. याआधी या अनुदानाची मर्यादा एक लाख 25 हजार पर्यंत होती.

 अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल?

1- या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करणे गरजेचे आहे. ( तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर अर्थात सीएससी सेंटरवर जाऊन देखील अर्ज करू शकतात.)

2- या संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेजवर तुम्ही जेव्हा पोहोचाल तेव्हा त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करावे.

3- त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करा यावर क्लिक करावे लागेल.

4- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सात बाबी दिसतील व यातील कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करावे.

5- यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरावी. त्यामध्ये तुम्ही तुमचे गाव,तालुका, मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य इत्यादी  माहिती नमूद करावी.

6- तपशील मध्ये ट्रॅक्टर निवडावा व एचपी श्रेणीमध्ये 20 ते 35 एचपीपर्यंत निवडा. त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकारामध्ये 2WD/4WD यापैकी कोणतीही एका बाबीची निवड करावी. त्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमची बाब सक्सेस होईल.

अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन अर्ज करून या अनुदानाचा लाभ मिळवू शकतात.

Ajay Patil

Recent Posts