अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले ;- तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार वाघापूर येथील एका जिल्हापरिषद शाळेत घडला आहे.
तालुक्यातील वाघापूर येथील गंभीर वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नराधम शिक्षकाने अनेक मुलींची छेडछाड व अत्याचार करण्याच्या प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
आज वाघापूर येथील ग्रामस्थ एकत्र आले त्यांनतर या शिक्षकाने अनेक मुलींची छेडछाड व गलिच्छ प्रकार केल्याचे उघडकीस आले.दत्तू पांडुरंग भांगरे असे या शिक्षकाचे नाव आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर गंभीरवाडी येथे अनेक मुलींची छेडछाड करणारा हा शिक्षक अनेक वेळा समज देऊन या शिक्षकाचे वागणे सुधारत नव्हते.
अखेर आज या नराधम शिक्षकास ग्रामस्थ व महिलांनी बेदम मारहाण करत चपलेचा प्रसाद दिला असून शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.