अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : कोपरगाव तालुक्याच्या पूर्वभागातील धोत्रे, भोजडे, गोधेगाव, खोपडी, तळेगाव मळे, दहेगाव बोलका आदी परिसरात सोमवारी ढगफुटीसारखा पाऊस झाला.
साधरण अडीच ते तीन इंच पाऊस झाला. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. साठ ते सत्तर घरांत पाणी घुसून नुकसान झाले. काहींच्या शेतजमिनी वाहून गेल्या.
कांदा चाळीत पाणी घुसले. अंदरसूल, नगरसूल, येवला तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने या भागातील सर्व पाणी कोपरगाव तालुक्यातील ओढ्यानाल्यांत येणार आहे.
कोपरगाव तालुक्यात पाच वाजेनंतर दमदार पाऊस झाला. सुमारे अडीच ते तीन इंचापर्यंत पाऊस झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पावसाने पेरण्या वाहून गेल्या.
येवला तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने या भागातील सर्व पाणी मंगळवारपर्यंत कोपरगाव तालुक्यातील गार, अदा, नारदा नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर येणार आहे त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews