अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६०४ झाला असून त्यातील १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माजी उपनगराध्यक्षांसह एका नगरसेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नागरिक प्रतिबंध उपायोजनांना हरताळ फासत असल्याने रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर व दुकानांत खरेदीसाठी गर्दी होत आहे.
मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली दिली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये ३ जणांची तपासणी करण्यात आली,
त्यात २ जण पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत २७५९ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६०४ पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved