अहमदनगर Live24 टीम,11 ऑगस्ट 2020 :- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी शिवबंधन बांधून गडाख यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला.
अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेना नेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर आता गडाखांवर या जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.शिवसेनेकडून याबाबत अधिकृत ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गडाख यांना शिवसेनेत आणण्यात शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची मुख्य भूमिका राहिली.
शिवसेना पक्ष प्रवेशामुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या असलेल्या विश्वासामुळे शेतकऱ्यांचे तसेच विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेल’, असे यानिमित्ताने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकासाठी चांगले निर्णय घेतले असून राज्यावरील कोरोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे.
माझ्या वडिलांचा आणि हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध होते. गेल्या १० वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर अनेकदा संबंध आला म्हणून मी आज शिवसेना पक्षात प्रवेश करत असून त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकत मंत्रिपदाची संधी दिली.
त्या विश्वासाला पात्र राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार आहे आणि शिवसेना वाढिसाठी झटणार आहे. शिवसेना हा पक्ष शेतकरी, कष्टकरी तसेच सर्व सामान्य जनता यांच्या बरोबर असून शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यात पक्षाचे मोठे काम आहे. असे गडाख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान गडाख यांच्या शिवसेना प्रवेशामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राठोड यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी गडाख यांना शिवसनेत प्रवेश देऊन त्यांच्या हाती नगर जिल्ह्याचा कार्यभार सोपवण्यात आला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved