अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील बहादरापूर येथे राहणाऱ्या १९ वर्षाची तरुणीने विषारी औषध पिवून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, बहादरापूर येथे राहणारी ज्योती शुभम शहाणे (वय- १९ वर्ष) हिने विषारी औषध सेवन केल्याने तिला राहाता ‘ तालुक्यातील लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी तिला तपासले असता ज्योती शुभम रहाणे हिचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांने दिली. प्रवरा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या माहितीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्योती ऱहाणे या तरुणीने नेमके कोणते विष पिले? का पिले? कसे पिले? याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. ज्योतीच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved