अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कंटेनर आणि अल्टो कारचा समोरा-समोर भीषण अपघात होऊन तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला.
बाळासाहेब डाके, त्यांची पत्नी अंबिका डाके, सुमन नरवडे (सर्व रा. शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत.
पैठण-औरंगाबाद मार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता कि अल्टो कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.