अहमदनगर शहर लवकरच खड्डेमुक्त ; आ. जगताप म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगरला खराब रस्त्यांचा एक अभिशापच लागलेला आहे. त्यातच आता मध्यंतरी झालेल्या अति पावसाने शहरातील अनेक महामार्ग खड्ड्यांच्या गर्तेत सापडले आहेत.

त्यामुळे या दुरवस्थेची आ. संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून हे रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.

गुरूवारी या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून त्याची आ. जगताप यांनी पाहणी करून विविध सूचना केल्या. रस्त्यालगतची स्वच्छता, डिव्हायडर दुरुस्ती,

दिशादर्शक फलक, अपघात रोधक उपाययोजना, चौक सुशोभिकरण करण्यासंदर्भात समक्ष पाहणी करून ही कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याबाबत अधिकार्‍यांना सांगितले.

नगर शहर खड्डेमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असून, प्रमुख मार्गाबरोबर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे, त्यामुळे नगर शहर लवकरच खड्डेमुक्त होईल, असे सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, धनेश कोठारी, अफजल शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.गायकवाड आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts