अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- काही दिवसांपासून राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातही तब्बल १७१ रुग्ण वाढले आहेत याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे
राज्यात महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ
राज्यात आज गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ झालीय. यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांनी जनतेला त्रिसूत्रीची पुन्हा आठवण करून देतानाच राज्य सरकारला नाईलाजाने लॉकडाऊनबाबत विचार करावा लागेल असे मत व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर पुन्हा लॉकडाउन देखील लागू केला जात आहे. राज्यभरात मागील २४ तासांत ५ हजार ४२७ नवे करोनाबाधित वाढले असुन, ३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
यावरून करोनाचे संकट हळूहळू पुन्हा गडद होतं की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८१ हजार ५२० वर पोहचली आहे.
आज 2,543 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण 19,87,804 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.5% एवढे झाले आहे. राज्यात आज 38 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.48% एवढा आहे.
मात्र, जनतेने योग्य खबरदारी घेऊन अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, कोरोना बाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना केल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने याबाबत सतर्क राहावे असे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहे.