अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रुग्णांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आज १६ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी परतले.
आज दिवसभरात ८७ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.आज दुपारी २६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आज सायंकाळी ७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.
पारनेर तालुक्यातील ६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.पिंपळगांव रोठा येथील ४५ वर्षीय महीला, ५० वर्षीय महीला, २० वर्षीय युवक, २९ वर्षीय पुरुष, ८ वर्षीय बालीका तसेच कुंभारवाडी येथील ५७ वर्षीय पुरुष.
श्रीरामपुर – १ : अशोकनगर येथील २१ वर्षीय युवक कोरोना बाधीत.
आज सायंकाळी वरीलप्रमाणे एकुण ७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आज दिवसभरात दुपारी २६ व सायंकाळी ७ असे मिळुन एकुण ३३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज १६ रुग्ण कोरोनातुन बरे होऊन घरी परतले असुन यात ८५ वर्षांच्या आजीचा समावेश
जिल्ह्यातील १६ कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे झाले असुन या रुग्णांनी कोरोनावर मात करून हा आजार बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका ८५ वर्षीय आजीबाईंचा यात समावेश आहे.
याप्रमाणे वरील १६ रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत.आज बऱ्या झालेल्या रुग्णांसह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
स्त्रोत : नोडल अधिकारी,
डॉ. बापूसाहेब गाढे,
जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews