अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवारपासून (दि. १७) सोमवारपर्यंत (दि. २०) हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते.
मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. या आठवड्यात ते कुणालाही भेटणार नाहीत, असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
मंत्री मुश्रीफ यांचा एक सर्मथक आजारी होता. त्याची विचारपूस करण्यासाठी ते त्याच्या घरी गेले. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
यामुळे जनतेला भेटल्यास पुन्हा समूह संसर्गाचा धोका वाढायला नको म्हणून मुश्रीफ स्वत:च होम क्वारंटाइन झाले आहेत. शुक्रवार (दि. १७) ते सोमवारचा (दि. २०) हा कालावधी मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यासाठी राखीव होता.
या पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना टॅबचे वाटप, गडहिंग्लज आणि उत्तूर येथे भेटी, शासकीय बैठका, वैयक्तिक गाठीभेटी असे सर्वच कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत.
दरम्यान, आता बदल्यांचा काळ सुरू आहे. ज्यांना बदल्यांची पत्र द्यावयाची असतील, तसेच ज्यांची महत्वाची कामे असतील त्यांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या कार्यालयात व शासकीय विश्रामगृह येथील कार्यालयीन अधीक्षक सचिनकुमार मठपती यांच्याकडे ती द्यावीत, असे सांगण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews