अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व उपआरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर याना अडीच लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. एसीबीच्या नशिकच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नशिकच्या पथकाकडून आज सकाळी सावेडी कचरा डेपो येथे ही कारवाई करण्यात आली. ठेकेदाराच्या बिलातील त्रुटी दूर करून बील मंजूर करण्यासाठी ठेकदराकडे पाच लाखांची मागणी करून अडीच लाख रुपये स्वीकारताना पथकाने ही कारवाई केली.
(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)