अहमदनगर पुलीस के भी हाथ लंबे होते हैं! बोठेच्या अटकेनंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला.

मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत.

आज सकाळी बोठेस अटक झाल्यानंतर अखेर उत्सुकता संपली आणि ‘कानून के की नहीं, अहमदनगर पुलीस के भी हात लंबे होते हैं’, हे सिध्द झालं आहे.नागरिकांकडून अहमदनगर पोलिसांचे कौतुक होत आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित बाळ बोठे याला हैदराबाद येथून अटक झालीय. अखेर अहमदनगरच्याच पोलिसांनी ही कारवाई केली.

बोठे याला अटक करण्यासाठी मुंबई, सोलापूरसह हैदराबाद पोलिसांची मदत अहमदनगर पोलिसांनी घेतली होती. बोठे हैदराबादमध्ये असल्याचं माहिती झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली.

मात्र, याची माहिती मिळाल्याने आरोपी बोठे काही मिनिटांच्या अंतराने पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts