Ajab Gajab News : कोरोना काळापासून नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण धरपड करत आहेत. अशा वेळी वेगवेगळ्या कंपन्या तरुणांना मुलाखतींसाठी बोलावत असतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला जे सांगणार आहे यामुळे तुम्हाला नक्कीच या कंपनीचा गर्व वाटेल.
आजच्या युगात बहुतेक सर्वच कंपन्या मुलाखती घेतात. यामध्ये अर्जदाराची क्षमता तपासली जाते. मुलाखतीला जाण्यापूर्वी लोक म्हणतात की घाबरू नये, आत्मविश्वास असला पाहिजे. सुंदर दिसणे आवश्यक आहे. चांगले कपडे परिधान केलेले असणे आवश्यक आहे.
पण हे सगळे असताना एका चिनी कंपनीने अनोखी पद्धत अवलंबली आहे. या कंपनीत चक्क मुखवटे लावून मुलाखती घेतल्या जातात. कारण नोकरीसाठी चेहऱ्यापेक्षा पात्रता महत्त्वाची असते, असे त्यांचे मत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, कंपनीने यापूर्वी एक मुलाखत घेतली होती, ज्याचा व्हिडिओ चीनमध्ये सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, उमेदवार मुलाखतीसाठी पोहोचताच सर्वांचे चेहरे पूर्णपणे मास्कने झाकलेले होते.
चेहऱ्याचा एकही भाग दिसत नव्हता. इतकेच नाही तर मुलाखत घेणाऱ्या टीममध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने पूर्ण मास्क घातलेला होता. तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की कोणीतरी कॅट मास्क, डॉग मास्क आणि एलियन मास्क घालून आला होता.
झेंग नावाच्या महिलेने 3 फेब्रुवारीला तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड केला. त्यांनी लिहिले, याचा सर्वाधिक फायदा अशा लोकांना होईल जे त्यांच्या लूकमुळे घाबरतात.
सर्वोत्तम उमेदवार निवडणे हे आमचे ध्येय…
चेंगडू अँट लॉजिस्टिक्स या कंपनीने हा व्हिडिओ त्यांच्याच संस्थेचा असल्याचे मान्य केले. त्यानंतर नवीन मीडिया ऑपरेटर, लाईव्ह-स्ट्रीम ब्रॉडकास्टर आणि डेटा विश्लेषक या पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. ते म्हणाले, आम्ही लोकांच्या क्षमतेवर अधिक लक्ष केंद्रित करतो.
चांगलं काम कोण करू शकतं यापेक्षा कोण दिसतं हे महत्त्वाचं आहे. आमचा उद्देश फक्त सर्वोत्तम उमेदवार निवडणे हा आहे. या प्रयोगामुळे उमेदवारांनाही ताण येत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.