मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून अहमदनगरमधील अजय महाराज बारस्कर यांनी टीका केली केल्यानंतर ते चर्चेत आले होते. दरम्यान आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेस उधाण आले आहे. येथे मी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बसलो असून ते येथे येणार होते पण अर्ध्यातून परत गेले पण मी येथे आलो असे असे म्हणत त्यांनी जरांगे यांना डिवचले.
दोन दिवसांपूर्वी ते वारीला गेले असता पंढरपूरमध्ये त्यांची गाडी अज्ञाताने जाळल्याची घटना घडली. बारस्कार यांना अनेक धमक्या देखील येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान आता गाडी जाळल्यानंतर बारस्कर हे आक्रमक झाले असून त्यांनी आता थेट मुंबईत जात सागर बंगल्याबाहेरील रस्त्यावर आज (शनिवारी) ठिय्या मांडत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी बारस्कर यांना ताब्यात घेतले आहे.
मनोज जरांगे यांच्यावर टीका
बारस्कर यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले उपोषण करून आरक्षण मिळत नसते. न्यायालयात सगळे काही सुरु असताना ‘तो’ आंदोलन का करत आहे?
‘तो’ आंदोलन करतो तर मी देखील आंदोलन करणार. ‘त्यांच्या’मुळेच ग्रामीण भागात जातीजातींत द्वेष पसरला आहे असे वक्तव्य करत मनोज जरांगे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली.
मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आपण येथे बसलो असल्याचे बारस्कर यांनी सांगितले. तसेच मनोज जरांगे यांचे नाव न घेता उपोषण करून आरक्षण मिळत नाही? मग ‘ते’सारखे सारखे उपोषणाला का बसतात, असे म्हणत डिवचले.