अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरात वाढती गुन्हेगारी, मोठ्या प्रमाणावर साईभक्तांचे होणारे शोषण, साईभक्तांना होणारा वाहतूक पोलिसांचा त्रास, आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या टोळ्या या विषयावर पोलीस प्रशसानाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापु कोते, रज्जाक शेख व सर्वपक्षिय शिर्डी ग्रामास्थांची बैठक पार पडली.
यावेळी ग्रामस्थ, राजकिय पदाधिकारी, माजी नगरसेवक, ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. कमलाकर कोते आणि कैलासबापु कोते यांनी आपल्या भाषणात शिर्डीच्या हितासाठी व साईभक्तांच्या सुरक्षितेसाठी मतभेद बाजुला ठेवून
एकत्र येण्याची गरज असून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लगतच्या काळात ग्रामसभा घेवून कठोर भूमिका घेतली जाईल, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचेदेखील लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.
शिर्डीत वाहतूक पोलिसांचा होणारा त्रास, पाकीटमारी, अवैधधंदे, वाढणाऱ्या टोळ्या, बेशिस्त वाहतूक याच्यावर पोलीस प्रशासनाचा वचक नाही, असा सूर या ग्रामस्थांच्या बैठकीत पुढे आला.
गाव कारभारी एकत्र येवून हे थांबविण्यासाठी जवळपास दीडशे ग्रामस्थ सामुहिक शपथ घेवून गाव हितासाठी काम करणार असल्याचे जाहीर केले. कृती समिती स्थापन करून, ग्रामसभा घेवून, मतभेद बाजुला ठेवून एकत्र काम करणार असल्याची विविध मान्यवरांनी आपली भावना व्यक्त केली.