वरळीतील स्पामध्ये क्रूरपणे भोसकण्यात आलेला “गोल्डमॅन” गुरू सिद्धप्पा वाघमारे याच्याबद्दल आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागलेत. तो त्याच्याकडे असणाऱ्या सोन्यामुळे व अतिश्रीमंतीमुळे प्रसिद्ध होता.
परंतु आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरू सिद्धप्पा वाघमारे याच्या अंगावर जे काही सोने होते ते सगळे बनावट होते. धक्कादायक म्हणजे अतिश्रीमंत वाटणाऱ्या गुरू सिद्धप्पा वाघमारे याची बँक खाती रिकामी होती, जवळजवळ तो दिवाळखोर झाला होता.
वाघमारेची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे असणारे भरपूर सोन जप्त केलं. पण तपासाअंती हे सोन बनावट असल्याचे निष्पन्न झाले. एका मीडियाशी बोलताना पोलीस सूत्राने सांगितले की, वाघमारे हे खोटे सोन्याचे दागिने 2017 पासून परिधान करत होता.
त्याने हे सर्व दागिने दादर येथील एका ज्वेलरी दुकानातून खरेदी केले होते. हे हुबेहूब खरे सोने असल्याचे भासत होते. त्याच्याबद्दल आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत.
वाघमारेच्या अनेक मैत्रिणी होत्या, त्यापैकी बहुतेक स्पा आणि क्लबमध्ये काम करत होत्या. तो जे काही कमवायचा तो ते या मैत्रिणींवर खर्च करायचा.
आपल्या कुटुंबाला तो कधीही पैसे द्यायचा नाही. हे पैसे व खोटे दागिने याद्वारे तो गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचा. त्याच्याकडे जी गाडी होती त्याचाही २२ हजार ईएमआय कट होत असे.
तो त्याच्या एरियात एक हिरो म्हणून ओळख जायचा. तो पोलिसांचा खबऱ्या होता असेही येथील लोक सांगतात. वाघमारेची डायरीही पोलिसांनी जप्त केली आहे. ही डायरी रोज त्याच्याकडे असायची. या डायरीमध्ये छोटे मोठे व्यवहार नोंदी आहेत,
पण त्याला पैसे नेमकं कुठून यायचे हे मात्र त्यात नाही. दरम्यान त्याच्याकडे ज्या काही चैन्स सापडल्या आहेत त्यामध्ये एका सोन्याच्या चेनवर रोहिदास आई तुळजा भवानी, दुसऱ्या एकावर भगवान खंडोबा आणि आणखी एका चैनवर गौतम बुद्धाचे लॉकेट होते.