Amazon’s Great Summer Sale : जर तुम्ही स्वस्तात मस्त अशा स्मार्टफोनची वाट पाहत असाल तर ही संधी आता आलेली आहे. कारण Amazon चा ग्रेट समर सेल मध्ये तुम्ही बंपर डिस्काउंटसह सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
यामध्ये Samsung Galaxy S20 FE 5G विक्रीच्या शेवटच्या दिवशी 64% सवलतीसह उपलब्ध आहे. 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP 74,999 रुपये आहे. तुम्ही सेलमध्ये 26,990 रुपयांना खरेदी करू शकता.
बँक ऑफरमध्ये फोनची किंमत आणखी 1,000 रुपयांनी कमी केली जाऊ शकते. तुम्ही हा फोन एक्सचेंज ऑफरमध्ये 22,200 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त डिस्काउंटसह खरेदी करू शकता. लक्षात ठेवा एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर आणि त्याच्या ब्रँडवर अवलंबून असेल.
वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन
या सॅमसंग फोनमध्ये तुम्हाला 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा इन्फिनिटी-ओ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. हा फुल एचडी + डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. यामध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देत आहे.
फोनच्या मागील पॅनलवर एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल आणि 12-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.
फोनमध्ये दिलेली बॅटरी 4500mAh आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Bluetooth 5.0, Wi-Fi, 5G, 4G आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.