मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू !

अहमदनगर :- महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. आज महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या सभेमध्ये सभापती मुदस्सर शेख यांनी कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगा विषयावरील ठराव वाचून दाखवला; त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठरावाला एकमताने मंजुरी दिल्याने तो मंजूर करण्यात आला.

सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचार्‍यांमध्ये मोठे आनंदाचा वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे यामध्ये जे कर्मचारी महानगरपालिकेमधून सेवानिवृत्त झाले आहे त्या कर्मचार्‍यांना पण सातव्या आयोगाचा लाभ मिळणार आहे.

कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याबद्दल युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, कार्याध्यक्ष गुलाब गाडे, शेख पाशा इमाम, बाबासाहेब मुदगल, आयुब शेख आदिंसह कर्मचार्‍यांनी महापौर व सर्व नगरसेवक तसेच मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांचे विशेष आभार मानले.

महानगरपालिकेत सुमारे 2 हजार 200 कर्मचारी असून, त्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचार्‍यांनी जल्लोष करुन आनंद व्यक्त केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts