Maharashtra News : कितीही विकासकामे केली तरी तुम्ही निवडून येतालच याची गॅरंटी आता राहिलेली नाही. दिवसेंदिवस राजकारण बदलत चालले आहे.अन असे म्हणत आमदार राम शिंदे भाषण करीत असतानाच अचानक भावुक झाले .
त्यांना अश्रु अनावर झाल्याने तोंडातुन शब्द ही निघेनात . चांगले काम केले तरी तुम्ही निवडुन येतालच असे आता राहिले नाही असे सांगुन ते म्हणाले जिल्ह्याला तीन मंत्र्याची आवश्यकता आहे पण दोन तरी हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
नगर तालुक्याच्यावतीने शिंदे हे भाजपचे प्रदेश प्रवक्ते झाल्या निमित्त बाजार समिती सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले , प्रतिभा पाचपुते , अरूण मुंडे , सुजीत झावरे , महेंद्र गंधे , आश्विनी थोरात आदि उपस्थीत होते .
यात जिल्हा भाजपच्या वतीने शिंदे यांना मंत्री मंडळ विस्तारात स्थान मिळावे असा ठराव केला . कर्डिले यांनी तो जाहिर केला . यावेळी शिंदे भावुक झाले . ते म्हणाले की , जिल्ह्याची भुख तीन आमदारांची आहे . हाच जिल्हयाचा इतिहास आहे .
पण सध्या दोन पक्षाचे सरकार असल्याने व जिल्ह्याच्या भौगोलीक विस्ताराचा विचार केला तर किमान दोन मंत्री हवेत . मात्र पक्षाचा जो आदेश येईल तो शिरसावंद असेल असे स्पष्ट करण्यास ते विसरले नाहीत . जिल्हा विभाजन आता काळाची गरज बनली आहे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत आहे . त्यासाठी ठोस भुमिका मांडू या सरकारच्या काळात निश्चित जिल्हा विभाजनाचा निर्णय झालेला असेल .
यावेळी कर्डिले म्हणाले की , तीन वर्षात सरकार नसल्याने त्रास झाला . पक्षाचे कार्यकर्ते अडचणीत आले . आता शिंदे राज्यात फिरतील पण त्यांनी नगर जिल्ह्याला वाऱ्यावर सोडू नये . शिंदे यांनी ताकद दिली तर आगामी स्थानीक स्वराज्य संस्थेत पक्षाला यश मिळेल.असे कर्डिले म्हणाले.