अहमदनगर लाईव्ह24 टीम / मुंबई :- शिवसेनेबाबत आमची चूक झाली, अशी कबुली देणाऱ्या भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत चांगलाच टोला लगावला.
मुनगंटीवार यांनी आता कितीही सांगितले की, आमची चूक झाली, चूक झाली, तरी आता ‘चुकीला माफी नाही’ असा डायलॉग अजितदादा यांनी बोलताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.
अर्थसंकल्पात एका भागालाच झुकते माप दिले. विदर्भ-मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय केला, हा भाजपाचा आरोपही खोडून काढताना महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोणत्याही भागावर अन्याय करणार नाही.
संपूर्ण राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीदेखील अजित पवार यांनी दिली. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिवसेनेबाबतच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या उत्तरात चांगलाच समाचार घेतला.
मुनगंटीवार आता कितीही म्हणाले, चूक झाली तरी आता चुकीला माफी नाही. यावेळी बाजूलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसले होते. त्यांच्याकडे पाहून अजितदादा म्हणाले, त्यांच्या उजव्या कानाला मी असतो, डाव्या कानाला बाळासाहेब थोरात असतात.
यांना माफी नाही ना? असा सवाल अजितदादा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाहत केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बसूनच सूचक हास्य केले व मान हलवली, तेव्हा सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com