अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- शेतकरी आंदोलनावरुन अधिक काळ सुरु असलेल्या आंदोलनावरुन सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना आवाहन केलंय.
शरद पवार यांचे आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करा, आम्ही पाठिंबा देऊ, असं आवाहन रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केले आहे. २००६ मध्ये करार शेतीचा महाराष्ट्र सरकाने संमत केला.
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची सुरुवात बारामतीपासून झाली. ‘लोक माझे सांगती’ या शरद पवार यांच्या आत्मचरित्रात करार शेतीचा उल्लेख केला आहे.
त्यांचे आत्मचरित्र कृषी कायदे म्हणून लागू करावं, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं सदाभाऊ खोत म्हणाले. केंद्र सरकारने करलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी व ते तीन कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्लीत शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरु आहे.
नुकताच माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी या आंदोलनाचे समर्थन करत केंद्र सरकारच्या विरोधात टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खोत यांनी त्यांच्या टिकेवर उत्तर देताना त्यांनी आजवर शेतकऱ्यांच्या नावाने केवळ राजकारण केले.
त्यामुळे या कायद्याला विरोध करत आहेत. मग या कायद्याऐवजी तुमचे आत्मचरित्रचकृषी कायदे म्हणून लागू करा ना, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. असे मार्मिक आवाहन खोत यांनी केले आहे.