अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे नगर दक्षिण युवासेना अधिकारी तसेच माजी नगरसेवक विक्रम राठोड यांना राजपाल कोट्यातून विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी, शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवसेनेचे उपनेते कै. अनिल राठोड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ४० वर्षे शिवसेनेचे कार्य वाढवण्यासाठी आहोरात्र मेहनत घेतली.
सामान्य लोकांचे प्रश्न सोडवन्यावर ते सातत्याने आग्रही राहिले. २५ वर्ष ते नगर शहरातून विधानसभेवर मोठ्या मतधिक्याने विजयी झाले होते.
शिवसेना पक्ष वाढीसाठी त्याचे ४० वर्ष योगदान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेवून त्यांनी समाजकारण व राजकारण यांची सांगड घालून अनेक विकासकामे त्यांनी शहरामध्ये केली आहे.
कै. राठोड यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचे चिरंजीव विक्रम राठोड हे सुद्धा गेल्या १० वर्षापासून शिवसेनेच्या कार्यामध्ये आहे. पक्ष संघटना वाढवने विधार्थीसेनेचे काम ते पक्षाचा माध्यमातून करत आहेत.
सध्या ते युवासेनेचे जिल्हा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राठोड यांच्या निधनामुळे नगर शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विक्रम राठोड यांना आमदारकीच्या माध्यमातून संधी द्यावी ही, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
हे पत्र पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, नगरसेवेक विद्या खैरे, सुवर्णा गेनप्पा, सुनिता कोतकर, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर येवले आदींनी पाठवले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved