महाराष्ट्र

नवनीत राणा यांच्याविरोधात अटक वॉरंट, वडीलही अडचणीत

Maharashtra News:विविध घटनांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात मुंबईतील कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे.

त्यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणाच्या खटल्यात न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्यांच्यासह त्यांच्या वडिलांनाही न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रासाठी खासदार राणा यांनी एका बोगस शाळा सोडल्याच्या दाखल्याचा वापर केला होता. यासंदर्भात त्यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याची सुनावणी आता सुरू झाली आहे. तेथे राणा उपस्थित राहत नसल्याने कोर्टाने राणा आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने अटक वॉरंट काढले आहे. आता याविरोधात राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे वडीलही अडचणीत आले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts