Avinash Bhosale : पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयनं अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीनं यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. सीबीआयनं गेल्या काही दिवासांपूर्वी भोसले यांच्या घरी छापे टाकले होते.
अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर सीबीआय नेमकी काय कारवाई करणार येणाऱ्या काळात समोर येईल. ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त केली होती. डीएचएफएल प्रकरणात सीबीआयकडून त्यांचा शोध घेण्यात आला होता.
भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे टातले होते. तर मागील वर्षी “सीबीआय’ने त्यांची तब्बल ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास “सीबीआय’कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.
दरम्यान, याच बॅंक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, “सीबीआय’कडून भोसले यांचा तपास सुरु होता.
भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिर महिन्यात “सीबीआय’ने छापे टाकून काही मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या मालमत्तांमधून महत्वाची कागदपत्रेही त्यांनी जप्त केली होती.