अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हे सरकार अधिक काळ टिकणार नाही या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी खिल्ली उडवली आहे.
हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….
ते म्हणाले, फडणवीस म्हणाले होते, त्यांना २२० पेक्षा जास्त जागा मिळतील. ते असेही म्हणाले होते की विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्या जागा विरोधकांना मिळणार नाहीत. पण त्यांची सर्व भाकिते खोटी ठरली.
हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !
विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता मिळेल एवढ्या सुद्धा जागा येणार नाहीत. पण फडणवीस यांचे कोणतेच म्हणणे खरे ठरले नाही. त्यामुळे फडणविसांनी आता कुठलेही भाकित करण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा असे थोरात म्हणाले.
हे पण वाचा :- माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !
भाजपच्या अंतर्गत निवडणुकीबद्दल बोलावं, असं मला वाटत नाही. आता त्यांच्यावर सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यामधील वाद सर्व महाराष्ट्र पाहत असून भाजपची आता अधोगती सुरू झाली असल्याचेही त्यांनी म्हटले.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …
कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीबाबत भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, मााझ्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. तसेच विधिमंडळाचे पक्षनेतेपदही आहे. या जबाबदा-या सांभाळताना पालकमंत्रीपदाला न्याय देणे अवघड होईल.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून
त्यामुळे पक्षातील इतर मंत्र्याला ही संधी मिळावी ही आपली प्रारंभीपासूनची भूमिका आहे. त्यामुळे हे पद नाकारले आहे. नगरचे पालकमंत्री पद मला हवे होते म्हणून मी हा नकार दिला असे अजिबात नाही.
हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !
नगरचेही पालकमंत्रीपद मला नको आहे. तसेही जिल्ह्याचे पालकत्व माझ्याकडेच असल्याने त्यासाठी खास पदाची आवश्यकता नाही असे स्पष्टीकरण नामदार थोरात यांनी यावेळी बोलताना दिले.