महाराष्ट्र

आरक्षणाची लढाई अंतिम टप्यात ! आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही – मनोज जरांगे पाटी

Maharashtra News : राज्याच्या सरकारने मराठा समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. सरकारने तीस दिवसांचा अवधी मागितला होता. आपण त्यांना चाळीस दिवस दिले. आज समिती राज्य सरकारला अहवाल देणार होती.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेच लागेल. मराठ्यांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नयेत व उद्रेकही करू नये, आरक्षणाची लढाई अंतिम टप्यात आहे. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा समाजाला आरक्षणासाठी झगडणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

येथील स्व. वसंतराव नाईक चौकात मराठा समाजाच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला होता. तेथेच जरांगे यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

जरांगे पाटील यांची पाथर्डीतील भेटीची वेळ चार वाजता होती. दुपारी दोन वाजल्यापासूनच सकल मराठा समाजाचे युवक चौकात येऊन थांबले होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी दुपारपासून चौकात थांबून होते.

रात्री उशिरा पाथर्डीत आलेल्या मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे जेसीबीने फुले उधळून व फटाक्यांची आतषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. जरांगे यांचे तासुक्यातील विविध गावांत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महिला व पुरुषांनी हार घालून व फुलांची उधळ करीत स्वागत केले.

या वेळी बोलताना जरांगे म्हणाले, २९ ऑगस्ट पासून मराठा आरक्षणाची लढाई आपण सुरू केलेली आहे. या लढाईत मराठा समाज एकसंघपणे सहभागी झाला आहे. लोक रात्री दीड वाजेपर्यंत थांबतात, यावरून आरक्षणाची गरज किती निकडीची आहे, हे समजते. आरक्षण मिळाले पाहिजे. सरकार आरक्षण कसे देत नाही, ते पाहू तुम्ही काळजी करू नका.

दि. १४ आक्टोबर २०२३ रोजी आंतरवाली सराटे येथे मराठा समाजाची आरक्षणासाठीची सभा आहे. त्या सभेला तुम्ही यावे, असे निमंत्रण मी देत आहे. लढाई आपण जिंकू, असा विशावास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

पाथर्डीत आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या युवकांनी जरांगे पाटील यांचा सत्कार केला. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दुपारी दोन वाजता होणारी पाथर्डीतील सभा रात्री साडेनऊ वाजता सुरू झाली. तरीही सकल मराठा समाजाचे युवक व तालुक्यातून आलेले नागरिक आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सात ते आठ तास युवक जरांगे पाटील यांची वाट पाहत बसले होते. जरांगे यांच्यावर समाजाचे प्रंचड प्रेम असल्याचे हे उदाहरण आहे. पाथर्डीकरांच्या स्वागताने मी भारावून गेल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

या वेळी प्रतापराव ढाकणे, सोमनाथ बोरुडे, बबलू वावरे, नगरसेवक बंडु पाटील बोर्ड, गोकुळभाऊ दौंड, दादासाहेब डांगे, सोमनाथ अकोलकर, डॉ. रामदास बड़े, सोमनाथ माने, उद्भव माने, सिताराम बोरुडे, देवा पवार, लालाभाई शेख, संदीप काटे, दिलीप गायकवाड, भिमाजी कचरे, अप्पासाहेब बोरुडे, नानासाहेब बालवे, माजी उपनगराध्यक्ष बंडुशेठ बोरुडे, दिलीप बोरुडे, विष्णुपंत अकोलकर, सुनील कदम, बन्सीभाऊ आठरे, सचिन वायकर, जमीर आतार, नासीरभाई शेख उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts