Mumbai News : अत्यंत कमी वेतन त्यात वाढत्या महागाईची भर पडल्याने कुटुंबाची दैनंदिनी चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे वेतनात वाढ व इतर प्रमुख मागण्यांसाठी बेस्टमधील कंत्राटी चालकांनी गेल्या सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटायचेच नाही, असा निर्धार कंत्राटी चालकांनी केला आहे.
बेमुदत कामबंद आंदोलनामुळे एक हजाराहून अधिक बसेस आगारातून बाहेर पडलेल्या नसल्याने बेस्ट प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांना बसथांब्यांवर तासन्तास बेस्टची प्रतीक्षा करावी लागली. संपामुळे बेस्ट सेवा कोलमडल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
एक हजारहून अधिक बस ठप्प
बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालकांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलनावर ठाम राहिले. कामबंद आंदोलनामुळे तब्बल एक हजारांहून अधिक बसेस विविध बस आगारांतून बाहेर न पडल्याने बेस्ट प्रवाशांचे हाल झाले.
दरम्यान, संपकरी कंत्राटी कामगारांच्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. बेस्टचे कामगार बस चालवत आहेत. मात्र, अपुऱ्या बस रस्त्यावर आहेत.
बसेस बंद
वरळी- ५३, प्रतीक्षानगर-७६,
आणिक – ८२, धारावी – ७२,
देवनार – ६१, शिवाजीनगर- ७९,
घाटकोपर- ८२, मुलुंड-९१,
मजास – ९७, सांताक्रुझ-८५,
गोराई ७० व मागाठाणे-५९.
कंत्राटी कंपन्यांच्या बस ठप्प
मातेश्वरी ४२२
डागा ग्रुप ५८०
टाटा कंपनी ३५५
ओलेक्ट्रा ५९
हंसा २८०
स्विच मोबॅलिटी १२