अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरण कोर्टात गेल्यावर अनेकदा आदेश देऊन ही राज ठाकरे तारखेला हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
न्यायालयाचे वॉरंट आल्यानंतर राज ठाकरे हे न्यायालयात हजर राहणार की वेळ वाढवून मागणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान राज यांचे नवे निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर चार कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे.
त्यामुळे राज यांनी पुढील 10 दिवसांमध्ये नियोजित असलेले सर्व नियोजीत कार्यक्रमही रद्द केले आहेत. दरम्यनच, परळी कोर्टाकडून राज ठाकरे यांना वॉरंट निघाले आहे.