अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Maharashtra news :- सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक (District Central Bank) तसेच विविध कार्यकारी सोसायट्या कर्ज उपलब्ध करून देत असतात.
सोलापूर जिल्ह्यातही जिल्हा मध्यवर्ती बँक (Solapur District Central Bank) तसेच सोसायटी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करुन देतात.
शेतकऱ्यांना शेतीमध्ये भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी बँका पीक कर्ज (Crop Loan) देत असतात. असे असले तरी अनेक शेतकरी बांधव (Farmer) पीक कर्जाची परतफेड करत नाहीत.
शेतीमधून उत्पादन मिळाल्यानंतरही शेतकरी बांधव पिक कर्ज फेडण्यास टंगळमंगळ करत असतात. सोलापूर जिल्ह्यातही बहुतांशी शेतकरी पिक कर्ज फेडण्यास दिरंगाई करत असल्याचे समोर आले आहे.
यामध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांचा देखील समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन आता शेतकऱ्यांना कर्ज मिळविण्यासाठी बँकांकडून हमीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
या हमीपत्रात नमूद केले असेल की, सदर उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून परतफेड केली जाऊ शकते. म्हणजेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून परस्पर कर्जाची रक्कम वसूल करण्याबाबत सदर शेतकऱ्याची काहीच हरकत नाही अशा आशयाचे सदर हमीपत्र असणार आहे.
सोलापूर जिल्हा बँकेला जवळपास शंभर वर्षाचा इतिहास आहे. असे असले तरी, बँक आर्थिक अडचणीत सापडली होती. तत्कालीन सरकारच्या काळात या बँकेवर प्रशासक देखील नेमन्यात आला होता.
सद्यपरिस्थितीत बँकेची परिस्थिती हळूहळू प्रगतीपथावर येत आहे. अनुत्पादित कर्जाची वसुली देखील बँकेकडून केली गेली आहे मात्र असे असतानाच शेतकऱ्यांकडे असलेली कर्जाची वसुली अद्यापही अपेक्षित अशी झालेली नाही.
अपेक्षित कर्जाची परतफेड शेतकरी बांधवांकडून झालेली नसली तरी देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच कर्ज देण्यास रुची दाखवली आहे.
असे सांगितले जाते की सोलापूर जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ घडवून आणण्यामागे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा खूप मोठा रोल आहे. जिल्ह्यातील कारखान्यांना मोठ्याप्रमाणात गाळप हंगामात ऊस दाखल होत असतो.
जिल्हा मध्यवर्ती बँकेला अशी आशा आहे की, कारखानदारांनी त्यांच्याकडे आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड करावी.
बँकेचे प्रशासकाची नियुक्ती आता आगामी काही दिवसात संपुष्टात येईल व नवीन संचालक मंडळ बँकेत कार्य पाहणार आहे. यामुळे बँकेची आर्थिक स्थिती व्यवस्थित राहण्यासाठी कारखान्यांच्या सहकार्याची विशेष आवश्यकता भासणार आहे.