महाराष्ट्र

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा: शेतकऱ्यांना मिळेल दुधावर ‘इतके’ अनुदान! परंतु लाभ घेण्यासाठी हे करावे लागणार

Maharashtra News : दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गेल्या कित्येक दिवसापासून दूध दरवाढी संदर्भात मागणी होती व याकरिता दूध उत्पादक शेतकरी बऱ्याच ठिकाणी आक्रमक झाल्याचे आपल्याला दिसून आले होते. दुधाचे दर वाढवावेत किंवा दुधावर अनुदान मिळावे

यासारख्या मागण्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुधाला अनुदान देण्यासाठीचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

दुधासाठी मिळणार पाच रुपयांचे अनुदान

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुधाला अनुदान देण्यासाठीचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार आता दुधासाठी सरकार पाच रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देणार आहे.

आता शेतकऱ्यांना या पाच रुपयांच्या अनुदानासह 32 रुपयांचा दुधाला दर मिळणार आहे. म्हणजेच आता 32 रुपयांचा हा दर ठरल्यामुळे दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर देणे गरजेचे आहे. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 72 टक्के दूध हे खाजगी संस्थांना दिले जाते.

परंतु सरकारकडून दिले जाणारे हे पाच रुपयांचे अनुदान फक्त सहकाराला देण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होणार असून बहुतेक दूध उत्पादक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना सरकारने अनुदान द्यावे अशा पद्धतीची मागणी किसान सभेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कराव लागेल हे काम

या अनुदानाचा लाभ मिळवण्याकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहेच आणि त्यासोबतच पशुधनाच्या आधार कार्डशी देखील लिंक असणे गरजेचे आहे.

तसेच त्याची पडताळणी करणे देखील गरजेचे राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबी केल्या नसतील तर त्या पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना एक जानेवारी 2024 पासून ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घेता येणार आहे.

त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन या संदर्भात मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येईल. अशी देखील माहिती समोर आलेली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts