Maharashtra Politics : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना विशेषत: सरकारी यंत्रणांना एक नवं फर्मान सोडलं आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना तसेच देशवासियांच्या देशभक्तीला उधाण आलेलं असताना सगळ्यांनीच गुलामीची मानसिकता सोडून तसेच इंग्रजांचे शब्द टाळून हॅलो ऐवजी आता वंदे मातरमने आपल्या संभाषणाची सुरुवात करावी, असा आदेश त्यांनी दिला आहे.
त्यावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने प्रत्युत्तरादाखल दुसरे शब्द वापरून अभिवादनाची पद्धत सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नेते-पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिले आहेत.
राष्ट्रगीत- वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे, मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते-कार्यकर्त्यांनी आपापसात भेटताना आणि जनतेशी संवाद साधतांना ‘जय बळीराजा’ म्हणावे, असे त्यांनी म्हटले आहे.