अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पुन्हा पोलिसांनी आज झाडाझडती घेतली.
त्यामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू हाती लागल्या असल्याचे पोलिस सूत्राकडून समजते. तसेच बोठे याची शनिवारी (दि.२०) पोलिस कोठडी संपत असून त्याला पारनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जरे यांची दि.३० नोव्हेंबर २०२० रोजी नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्याच्या हद्दीतील जातेगाव घाटात दोघाजणांनी गळा चिरून हत्या केली होती. त्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत छडा लावत पाच संशयित आरोपींना जेरबंद होते.
मात्र, या घटनेमागे मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचे तपासात समोर आले. तेव्हा पासून बोठे गेल्या १०२ दिवसांपासून फरार होता. त्याला पोलिसांनी हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरातून मोठ्या शिताफीने अटक केली.
अटक केल्यानंतर त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दिली होती. या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपत असून त्याला पुन्हा पारनेर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, बालिकाश्रम रस्त्यावरील बाळ बोठे याच्या घराची पुन्हा झाडा झडती पोलिसांनी बोठेच्या उपस्थित घेतली. यामध्ये महत्त्वाच्या वस्तू ही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे बोठेंच्या अडचनीत पुन्हा वाढ होत असल्याचे चिन्ह दिसत आहेत.