अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- लोकप्रिय असलेले Whatsapp, Instagram व फेसबुक मेंसेंजर आज (शुक्रवारी) रात्री जगभरात ठप्प झाले होते. लाखो युजर्सने ही तक्रार केली की Whatsapp मेसेज सेंट होत नाही किंवा येत नाही.
इन्स्टंट मॅसेजिंगसाठी सर्वाधिक प्रमाणावर वापरले जाणारे Whatsapp सध्या डाऊन आहे. जगभरातील युजर्सना याचा फटका बसला.
आयओएस आणि अँड्रोइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील युजर्सना व्हॉट्सअॅप वापरण्यास अडचणी येत होत्या. फोटोज, जीआयएफ, स्टीकर्स, व्हिडिओ पाठवण्यात अडचणी आल्या होत्या.
त्याचप्रमाणे Whatsapp वर आलेले फोटो, व्हिडिओ, स्टीकर्स, अन्य फाइल्स डाऊनलोड करण्यासही अडचणी येत असून काही युजर्सना टेक्स्ट मेसेजेस पाठवण्यातही अडचणी आल्या.
दरम्यान Whatsapp डाऊन झाल्यावर युजर्सनी ट्विटरवर यासंदर्भातील ट्रेड सुरू केला होता. तर अनेकांनी या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. तर काही जणांनी यावर मिम्स बनवून ट्विटरवर शेअर केले आहेत.