अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- हॉस्पिटल टाकायचे असल्याने तू माहेराहून २० लाख रुपये घेऊन ये. नाहीतर घटस्फोट दे’ अशी मागणी करत छळ करणाऱ्या डॉक्टर पतीविरुद्ध विवाहित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.(crime news)
विवाहिता श्रध्दा प्रद्युम्न अंबेकर-काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पैठण पोलिसांनी डॉ. पतीसह सासू, सासरे व दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पिशोर (ता.कन्नड) येथील डॉ. प्रद्युम्न सुनील अंबेकर यांच्यासोबत त्यांचे दि. ६ डिसेंबर २०१५ रोजी लग्न झाले.
दोन महिन्यानंतर कन्नड येथील एका खासगी दवाखान्यात काम करत असताना डॉ. पतीने विवाहितेचा छळ सुरू केला. सासू अलका सुनील अंबेकर,
सासरे सुनील रंगनाथ अंबेकर व दिर अनिरुद्ध सुनील अंबेकर यांनी मारहाण करत ‘तु नोकरी करत नाही. काही कमवत नाही’ असे म्हणत मारहाण सुरू केली.
तसेच मला माहेरी काढून दिले. दरम्यान माहेरच्या मंडळींनी कसेबसे विवाहितेला पुन्हा सासरी नेऊन सोडले. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा विवाहितेला माहेरी हाकलून दिले.
विशेष म्हणजे तब्बल ६ महिन्यानंतर सासरच्यांनी फुलंब्री पोलिस ठाण्यात विवाहितेविरुद्ध पतीची हत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यावर विवाहितेने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला.
असेही विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान डॉक्टर पतीकडून होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात अखेर विवाहितेने पोलीस ठाणे गाठून वरील चौघा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.