Budget session : देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. यामध्ये काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना आता राज्यात नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प कधी सादर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. 9 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
त्यामुळे या नवीन अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 9 मार्चला दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. यामध्ये विरोधी पक्ष देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
शिंदे गट आणि भाजपसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा असणार आहे. दरम्यान, कृषी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सिंचन, ऊर्जा आदी विभागांना अर्थसंकल्पात झुकते माप मिळणार हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे. सर्वसामान्य लोकांना यामधून अपेक्षा आहेत.
दरम्यान फडणवीसांचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्यांनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी त्यांनी एक लिंकही शेअर केली आहे. जनतेच्या मागण्याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात दिसाव यासाठी फडणवीसांनी ही नवी संकल्पना मांडली आहे. यासाठी नागरिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.